इंदोर / वृत्तसंस्था
डावखुरा मध्यमगती गोलंदाज इसुरु उदणा भारताविरुद्ध तिसऱया व शेवटच्या टी-20 सामन्यात खेळू शकणार नाही, असे संकेत लंकेची मुख्य प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी दिले. उभय संघातील तिसरी टी-20 शुक्रवारी पुण्यात खेळवली जाणार आहे. इसुरु उदणा यापूर्वी दुसऱया सामन्यात दुखापतग्रस्त झाला. त्याच्या पाठीला दुखापत झाली आहे. लंकेला त्या सामन्यात एकतर्फी पराभवाला सामोरे जावे लागले. सध्या लंकन संघ मालिकेत 0-1 फरकाने पिछाडीवर आहे.
उदणाच्या दुखापतीचे स्वरूप स्पष्ट करताना लंकेचे प्रशिक्षक मिकी आर्थर म्हणाले, ‘उदणाला नेमकी किती दुखापत झाली आहे, याचे अद्याप निदान झालेले नाही. मात्र विंडीजविरुद्ध नवऱयासाठी तो उपलब्ध होऊ शकेल अशी आम्हाला अपेक्षा आहे’.
उदणा हा टी-20 क्रिकेटमध्ये लंकेचा सर्वोत्तम गोलंदाज असून यामुळे त्याच्याविषयी अधिक काळजी घेतली जाणे स्वाभाविक मानले जाते. फेब्रुवारी महिन्यात अद्याप बरेच क्रिकेट खेळायचे असून आम्ही कोणताही धोका घेऊ इच्छित नाही, असे आर्थर म्हणाले. आर्थर मागील महिन्यातच श्रीलंकन क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी विराजमान झाले आहेत. भारत-लंका यांच्यातील 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील गुवाहाटीतील पहिला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे होऊ शकला नव्हता. त्यानंतर दुसऱया लढतीत भारताने लंकेला धोबीपछाड दिला. अर्थात, लंकेन संघाला भारताविरुद्ध मागील दहा वर्षात एकही मर्यादित षटकांची मालिका जिंकता आली नसल्याने येथे ही मालिका किमान बरोबरीत तरी सोडवण्याचे त्यांचे प्रयत्न असणार आहेत.