गॅले / वृत्तसंस्था
येथील पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा पहिला डाव 222 धावांवर गुंडाळल्यानंतर पाकिस्तानची पहिल्या दिवसअखेर 18 षटकात 2 बाद 24 अशी खराब स्थिती होती. अब्दुल्ला शफीक व इमाम हक हे दोन्ही सलामीवीर स्वस्तात बाद झाले. लंकेच्या डावात दिनेश चंडिमलने सर्वाधिक 76 धावांचे योगदान दिले. पाकिस्तानतर्फे शाहिन शाह आफ्रिदीने 58 धावात 4 तर हसन अली, यासीर शाह यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.