जगभरात धातूंचे मूल्य निश्चित करणारी संस्था बंद, 144 वर्षांपासून कार्यरत होती संस्था
जगभरात धातूंची बेंचमार्क प्राइस निश्चित करणाऱया लंडन मेटल एक्सचेंजा ओपन ट्रेडिंग फ्लोर द रिंग कायमस्वरुपी बंद होणार आहे. या हॉलमध्ये मागील 144 वर्षांपासून तांबे, झिंक आणि ऍल्युमिनियम यासारख्या धातूंचे दर निश्चित होत आले आहेत. हा जगातील एकमात्र ट्रेडिंग फ्लोर शिल्लक होता, जेथे समोरासमोर आवाजाने आणि हाताच्या खुणांनी व्यवहार केले जात होते.
या ट्रेडिंग हॉलला कोरोनामुळे यापूर्वी टाळेबंदीच्या काळात बंद करण्यात आले होते. तर लंडन मेटल एक्सचेंज (एलएमई) हा हॉल आता कायमस्वरुपी बंद करणार आहे. तेथे धातूंचे व्यवहार आता केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमातून होणार आहेत. एलएमईच्या व्यवस्थापनाने मंगळवारी सदस्यांना यासंबंधी माहिती दिली आहे.
कोट्स
तुम्ही रिंगवर प्रेम न करता एलएमईवर काम करू शकत नाही. हा अमाच्या इतिहास आणि संस्कृतीचा एक मोठा हिस्सा राहिला आहे. परंतु आता हे क्षेत्र पुढे गेले असून आम्हालाही त्यानुसार पावले टाकावी लागतील.
मॅथ्यू चेम्बरलेन, सीईओ, लंडन मेटल एक्सचेंज