वृत्तसंस्था/ लंडन
जुलै महिन्याच्या प्रारंभी येथे होणारी लंडन डायमंड लीग ऍथलेटिक्स स्पर्धा कोरोना महामारी संकटामुळे रद्द करण्यात आल्याची माहिती मंगळवारी ब्रिटीश ऍथलेटिक्स संघटनेने दिली आहे.
2012 च्या आाŸलिंपिक स्पर्धेचे यजमानपद भूषविणाऱया लंडनच्या स्टेडियमवर ही डायमंड लीग ऍथलेटिक्स स्पर्धा 4-5 जुलै रोजी घेण्यात येणार होती पण संपूर्ण ब्रिटनमध्ये कोव्हिड-19 महामारीमुळे सर्व क्रीडास्पर्धा स्थगित किंवा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. 2020 च्या डायमंड लीग ऍथलेटिक्स हंगामाला 17 एप्रिलपासून डोहा येथे प्रारंभ होणार होता पण कोरोना महामारीमुळे डायमंड लीग मालिकेतील पहिल्या सहा स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत. पॅरीस आणि लॉसेन येथील या स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय यापूर्वीच जाहीर केला आहे.