नवी दिल्ली
इटलीतील लक्झरी कार निर्माती ऑटो कंपनी लंबोर्गिनीच्या उरुस या गाडीची भारतात विक्रमी विक्री झाली असल्याचे समजते. सुव्ह गटातील उरुसचा खप 100 वर पोहचला आहे. हा एक विक्रमच मानला जात आहे. 3.15 कोटी रुपयांच्या या आरामदायी लक्झरी गाडीचे सादरीकरण भारतात 2018 मध्ये करण्यात आले होते. एकंदर लक्झरी कार्सच्या वाटय़ामध्ये या गाडीचे योगदान 50 टक्के असल्याचे सांगण्यात येते. सुपर लक्झरी गटात या गाडीने आपले स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. देशातील टायर वनसह टायर टू शहरातही या गाडीने लोकप्रियता मिळवली आहे.