जत्रोत्सव होणार नाही. केवळ धार्मिक विधीच होणार. शिरगावात होमकुंडासाठी भाविकांसाठी लाकडांचे भोरे. गावच्या सीमा बंद
डिचोली/प्रतिनिधी
डिचोली तालुक्मयातील शिरगाव गावची प्रसिध्द देवी लईराईचा जत्रोत्सव यावषीही सार्वजनिकरित्या साजरा होणार नसून केवळ ब्राह्मण आणि चौगुले मानकऱयांच्या मार्फत मंदिरात धार्मिक विधीच होणार आहे. यासंदर्भात देवालय प्रशासक मामलेदार प्रवीणजय पंडित यांनी बैठक घेऊन वाढत्या कोरोनाच्या फैलावामुळे जत्रोत्सव रद्द करण्याची सुचना केली होती. त्याप्रमाणे सध्या शिरगाव गावात प्रवेश करणारे सर्व मार्ग पोलिसांच्या मदतीने बंद करण्यात आले आहेत. जत्रोत्सव होणार नसला तरी शिरगावात होमकुंडस्थळी भाविकांकडून लाकडांचे भोरे वाहण्यात आले आहेत. तर जत्रोत्सवासाठी पाच दिवशीय सोवळे व्रताला कालपासून (बुधवारपासून) प्रारंभ झाला.
गेल्यावषी कडक लॉकडाऊन असल्याने शिरगाव गावातील देवी लईराईचा जत्रोत्सव रद्द करण्यात आला होता. तर देवस्थान समितीतर्फे देवीच्या असंख्य धोंडगण व भाविकांना शिरगावात उपस्थिती न लावता घरीच देवीचे नामस्मरण करण्याचे आवाहन करण्यात आले होते. तसेच पोलिसांकरवी गावात प्रवेश करणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले होते. यावषीही तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात सध्या राज्यव्यापी कर्फ्य? अंमलात असून कोरोनाचे रूग्ण राज्यभारात वाढत असल्याने यावषीही जत्रोत्सव रद्द करण्याची सुचना मामलेदारांनी एका विशेष बैठकीत केली आहे. आणि सदर सुचनेला मान देऊन देवस्थान समितीनेही यावषीही जत्रोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ ब्राह्मणाकरवी मंदिरात धार्मिक विधीच होणार.
होमकुंडस्थळी भाविकांकडून भोरे अर्पण
यावषी जत्रोत्सव होणार नसला तरी शिरगावात होमकुंडस्थळी मोठय़ा प्रमाणात लाकडांचे भोरे भाविकांकडून अर्पण करण्यात आले आहेत. गेल्यावषी कडक लॉकडाऊनमुळे भाविकांना होमकुंडाला लाकडांचे भोरे देणे शक्मय झाले नव्हते. तसेच देवस्थान समितीनेही भाविकांना जत्रोत्सव रद्द झाल्यामुळे लाकडांचे भोरे अर्पण करू नये अशी सुचना दिली होती. मात्र यावेळी लॉकडाऊन नसल्याने भाविकांनी आपल्या नवसानुसार तसेच वार्षिक प्रथेनुसार होमकुंडस्थळी लाकडांचे भोरे अर्पण केले आहेत.
गावाच्या सीमेवर पोलीस तैनात
शिरगावात जत्रोत्सव होणार नसल्याने गावात भाविकांनी किंवा धोडगणांनी प्रवेश करू नये यासाठी गावच्या सर्व सीमांवर पोलीस तैनात करण्यात आले आहेत. सध्यातरी या पोलिसांकडून गावात येणाऱया लोकांना अडविले जात नाही. मात्र दि. 16 ते 20 मे असे पाच दिवस सर्व रस्ते कडकपणे अडविण्यात येणार आहेत. केवळ जिवनावश्यक सामानांचीच वाहने आत सोडली जाणार असून गावातील लोकांचीही कसून चौकशी करून गावात सोडले जाणार आहे.
पाच दिवशीय सोवळे व्रताला प्रारंभ
देवीच्या श्रध्देपोटी जत्रोत्सवात धोंडगण म्हणून व्रत पाळणाऱया देवीच्या धोंडगणांच्या सोवळे व्रताला काल बुध. दि. 12 मे पासून प्रारंभ झाला आहे. काही धोंडगण पाच दिवशीय तर काही धोंडगण तीन दिवशीय सोवळे व्रत पाळतात. जत्रेच्या पाच किंवा तीन दिवस पूर्वी अज्ञात ठिकाणी राहून सुचिर्भ?त होऊन धोंडगण सोवळे व्रत पाळतात. या पाच दिवशीय व्रताला काल बुधवारपासून प्रारंभ झाला. सध्ता कोरोनाचा हाहाकार असल्याने तसेच राज्यात 144 जमावबंधी आणि कर्फ्य? अंमलात असल्याने धोंडगणांना एकत्रितपणे वावर करणे शक्मय नाही. तरीही काही ठिकाणी कोवीडच्या सर्व नियमांचे पालन करून धोंडगणांनी आपल्या सोवळे व्रताला प्रारंभ केला आहे.
यावषीही भाविक व धोंडगणांनी घरीच देवीची आराधना करावी – महादेव गावकर
गेल्यावषी जत्रोत्सव रद्द झाल्यानंतर देवीच्या असंख्य भाविका भक्तांना आणि धोंडगणांनी देवस्थान समितीतर्फे घरीच राहून देवीचे नामस्मरण आणि आराधना करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला जागत भाविकांनी सहकार्य केले होते. आणि शिरगावात कोणीही उपस्थिती लावली नव्हती. यावषीही कोवीड महामारीमुळे ह प्रसिद्ध जत्रोत्सव रद्द करण्याची पाळी आली आहे. तरी भाविकांनी व धोंडगणांनी आपापल्या घरीच देवीचे नामस्मरण करावे. असे आवाहन देवस्थान समितीचे अध्यक्ष महादेव गावकर यांनी केले आहे.
सर्वांनी सहकार्य करावे आणि स्वतःचीही काळजी घ्यावी – अच्यत गावकर
शिरगावचा प्रसिद्ध देवी लईराईचा जत्रोत्सव यावषीही रद्द करण्यात आल्याने भाविक भक्तांनी त्याची नोंद घेत सहकार्य करावे. शिरगावतील सर्व मार्ग जत्रेच्या दिवशी दि. 16 ते दि. 20 या दरम्यान बंद असणार. कोणालाही आत प्रवेश दिला जाणार नाही. त्यासाठी कोणीही शिरगावात प्रवेश करू नये. कोरोना महामारीमुळे आज सर्वत्र भयानक वातावरण पसरले असताना सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन शिरगावचे सरपंच अच्य?त गावकर यांनी केले आहे.