प्रतिनिधी / खंडाळा :
सातारा-पुणे मार्गावरील खांबाटकी बोगद्याच्या पुढे उतारावर लक्झरी बसचा ब्रेक फेल झाल्याने पाच वाहने एकमेकांवर आदळली. या अपघातात टाटा स्ट्रोम व महिंद्रा मॅक्स जीपचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले .दरम्यान या अपघातामुळे तब्बल एक तास वाहतूक ठप्प झाली होती. सुदैवाने कोणतीही जीवीत हानी झाली नाही.
रविवारी दुपारी सव्वाचारच्या सुमारास पुणे बाजुकडे जाणारी लक्झरी बस (क्र. MH- 09 – CV – 9207) ही खांबाटकी बोगदा ओलांडून पुढे आल्यावर उतारावर ब्रेक फेल झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ती बस पुढे चाललेल्या टाटा स्ट्रॉम (क्र . MH 12 – LJ – 3643), महिंद्रा मॅक्स जीप (क्र . MH- 12 – EF – 5066) बजाज मोटार सायकल (क्र . MH 09 – CP – 5047) आणि लक्झरी बस (क्र. MH 46 – BB – 9564) वर आदळली. यामध्ये टाटा स्ट्रोम व महिंद्रा मॅक्सचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. या अपघातात बस रस्त्यातच आडवी झाली. तर एक तास वाहतूक ठप्प झाली होती.
खंडाळा पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजुला करण्यात आली. खंडाळ्याचे पोलीस निरीक्षक महेश इंगळे, वाहतूक पोलीस विठ्ठल पवार, शरद यादव, Asi अहेरराव, पी एस फरांदे, ए एम जाधव, एस डी जाधव, एस ए मोरे, विजय पिसाळ यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.