जिल्हाधिकाऱयांची चिकोडी-रायबाग तालुक्मयांना भेट : संभाव्य पूरस्थितीचा घेतला आढावा
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना महामारीचा फैलाव थोपविण्यासाठी लक्षणे नसणाऱया बाधितांवरही कोविड केअर सेंटरमध्येच उपचार करण्यात यावेत. कोणत्याही परिस्थितीत त्यांच्यावर घरी उपचार करू नयेत, अशी सूचना जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी रविवारी आरोग्य विभागातील अधिकाऱयांना केली आहे.
चिकोडी व रायबाग तालुक्मयातील काही गावांना भेटी देऊन जिल्हाधिकाऱयांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन अधिकाऱयांशी चर्चा केली. चिकोडी येथील वॉर्ड क्रमांक 23 मध्ये तर घरात आयसोलेशनमध्ये असणाऱया बाधितांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. आरोग्य विभागाकडून दिल्या जाणाऱया औषधांचे व्यवस्थित सेवन करा. सकस अन्न खा, असा सल्ला जिल्हाधिकाऱयांनी दिला.
आपल्याला कसलीही लक्षणे नाहीत म्हणून घरीच राहू नका. घरी राहायचे असेल तर एकटे राहू शकता. एका घरात दोघा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असेल तर त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये हलवा. घरी स्वतंत्र राहण्याची व्यवस्था असेल तर एकाच रुग्णाला सोय करून द्या, असा सल्लाही जिल्हाधिकाऱयांनी दिला. पांगिरे व येडूर येथील कोविड केअर सेंटरना भेटी देऊन त्यांनी पाहणी केली. रायबाग तालुक्मयातील नंदिकुरळी, अलकनूर गावांना भेटी देऊन त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.
सध्या एनडीआरएफचे पथक चिकोडी तालुक्मयातील येडूर येथे तळ ठोकून आहे. संभाव्य पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे. जिल्हाधिकाऱयांनी एनडीआरएफच्या पथकाची भेट घेऊन त्यांच्याशीही चर्चा केली. संभाव्य पुराचा सामना करण्यासाठी करण्यात आलेल्या तयारीची त्यांनी पाहणी केली.