वार्ताहर / हिंडलगा
हिंडलगा ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात येणाऱया लक्ष्मीनगर येथील श्री लक्ष्मी मंदिरासमोरील गल्लीतील एका बंद अवस्थेत असलेल्या घरामध्ये परिसरातील तळीरामांचा उपद्रव वाढला आहे. घर रिकामी असल्याने तळीरामांनी दारू व गांजा पिण्यासाठी वापर सुरू केला असून रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ग्राम पंचायतीने त्वरित लक्ष देऊन तळीरामांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
याबाबत परिसरातील रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार लक्ष्मीनगरमधील लक्ष्मी मंदिरासमोरील गल्लीमध्ये एक घर बंद अवस्थेत आहे. या ठिकाणी मालक फिरकतच नाहीत. त्यामुळे परिसरातील काही टोळक्यांनी याचा वापर दारू व गांजा पिण्यासाठी सुरू केला आहे. या ठिकाणी दिवसा व रात्रीच्या वेळी देखील काही युवक घोळके करून दाखल होत पार्टी करत आहेत. याचा नाहक त्रास आजुबाजुच्या रहिवाशांना सहन करावा लागत आहे. शिवाय परिसरात मोठय़ा प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यातच तळीरामांचाही उपद्रव वाढल्याने नागरिकांना डोकेदुखी झाली आहे. त्यामुळे हिंडलगा ग्राम पंचायतीने याची दखल घेत त्वरित कारवाई करून तळीरामांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आह