पुसेसावळी / वार्ताहर
ऐन दिवाळीत चोरट्यांचा पुसेसावळीत धुमाकूळ
शनिवारी रात्री लक्ष्मीपूजनानंतर चोरट्यांनी शहाजी आत्माराम माळी यांच्या घरात धाडसी चोरी केली.घराच्या मागील बाजूने घरात घुसून दरवाजे उघडून घरातील लक्ष्मीपूजन केलेले घंटण,चेन,अंगठ्या,कर्णफुले,बोरमाळ,इत्यादी सुमारे 11 तोळे सोने,चांदीचे दागीने व 15 हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली.
येथे ऐन दिवाळीच्या दिवशीच चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे.लक्ष्मीपूजनाच्या रात्रीच सुमारे पावणे चार लाखाचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्यामुळे पुसेसावळीत चोरट्यांची दहशत निर्माण झाली आहे.
शुक्रवारी रात्री कराड रोडच्या दक्षिणेस असलेला बंगला फोडून चोरट्यांनी धुमाकूळ घातला.परंतु,त्याबाबत संबंधितांनी कोणतीही तक्रार पोलीसांत दिली नाही.

पोलीसांनी सदर घटनास्थळाला भेट देवून पाहणी केली.
तातडीने साताऱ्याहून श्वान पथक बोलविण्यात आले.परंतु,खंडोबा मंदीर ते पोष्ट आॅफिस दरम्यान ते घुटमळले.ठसे तज्ञांना पाचारण करुन संबंधित ठिकाणाचे ठसे घेण्यात आले आहेत.घटनास्थळाला उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख यांनी भेट देवून पाहणी केली.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्नेहल सोमदे करीत आहेत.