नवी दिल्ली
रसायन निर्मितीच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱया लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्त्रिजचा आयपीओ शेअर बाजारात 15 मार्चला सादर केला जाणार आहे. सदरच्या आयपीओअंतर्गत कंपनी 600 कोटी रुपये उभारणार असल्याचे समजते. आयपीओसाठी कंपनीच्या समभागाचा दर 129 ते 130 रुपये ठेवण्यात आला आहे. याअंतर्गत 300 कोटी रुपयांचे नवे समभाग बाजारात सादर केले जाणार आहेत. कंपनीने यापूर्वी इक्वीटी समभागांच्या माध्यमातून 200 कोटी रुपये जमवले असल्याचे समजते. 15 मार्चला खुला होणारा कंपनीचा आयपीओ 17 मार्चला बंद होणार आहे.