बेळगाव \ प्रतिनिधी
देशावर कोरोनाचे संकट ओढवले आहे. शासन कोरोनाला हद्दपार करण्यासाठी विविध उपाययोजना करत आहे. कोरोनाग्रस्तांसाठी समाजातून मदतीचा ओघ सुरूच आहे. आरव अरविंद मुचंडी याच्या तिसऱया वाढदिवसानिमित्त लक्ष्मी प्रसाद मुचंडी यांनी पंतप्रधान साहाय्यता निधीला 51 हजार रुपये व मुख्यमंत्री साहाय्यता निधीला 51 हजार रुपयांचा धनादेश दिला आहे. त्यापैकी मुख्यमंत्री साहाय्यता निधीचा धनादेश आमदार अनिल बेनके यांच्याकडे सुपूर्द केला.
कोरोनामुळे अनेकांना जीवनावश्यक वस्तू मिळत नसल्यामुळे हाल होत आहेत. याची दखल घेत मुचंडी यांनी गोरगरीब, गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.