ऑनलाईन टीम / लखनऊ :
लखनऊमधील सैन्य छावणीमध्ये भाजपचे नेते संजय सिंह यांना तात्काळ बंगला खाली करण्याचे आदेश शनिवारी सैन्य अधिकारी सकाळी गेले होते. यावेळी पुन्हा एकदा बंगल्याच्या कागदपत्राची तपासणी केली गेली.
संजय सिंह यांना 3.14 एकर जमीन तात्काळ खाली करण्यासाठी सांगितले आहे.
दरम्यान, याआधी या बाबतची माहिती देण्यासाठी संजय सिंह यांना नोटीस देखील पाठवण्यात आली होती. संध्याकाळी पुन्हा एकदा सैन्य अधिकारी बंगल्यावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बंगल्याच्या क्षेत्रफळात जवळपास 4.15 एकर जमीन आहे. ज्यातील 3.14 एकर जमिनीवर संजय सिंह यांनी कब्जा केला आहे.