ऑनलाईन टीम / लखनऊ :
माजी मंत्री गायत्री प्रसाद प्रजापती यांच्या अमेठीतील घरावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी सकाळी छापा टाकला. सध्या ईडीचे 6 अधिकारी त्यांच्या घरी चौकशी करत आहेत. प्रजापती यांच्या मुलाच्या लखनऊ आणि विभूती खंड विभागातील कार्यालयात आणि प्रजापती यांच्या ड्रायव्हरच्या घरावरही ईडीने एकाचवेळी छापे छापेेमारी केली.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी प्रयागराजचे इडीचे अधिकारी अमेठी कोतवाली परिसरातील गृहनिर्माण विकास वसाहतीतील गायत्रीप्रसाद यांच्या घरी पोहोचले. सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर ईडीने अतिरिक्त मालमत्तेच्या प्रकरणात गायत्री प्रजापतीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तपासात असे दिसून आले की, 2012-2017 या वर्षात प्रजापतीने उत्पन्नापेक्षा सहापट अधिक मालमत्ता कमावल्या. वैध स्रोतांकडून त्यांचे उत्पन्न सुमारे 50 लाख रुपयांच्या आसपास होते, मात्र, त्यांनी तीन कोटींहून अधिक मालमत्ता कमावली.
प्रजापतींच्या नातेवाईकांच्या नावाने याच कालावधीत 22 बेनामी मालमत्तांची खरेदी करण्यात आली आहे. त्यामध्ये प्रजापती यांचे स्वीय सहाय्यक आणि ड्रायव्हर यांच्या नावाचाही समावेश आहे.