बेळगावमधील मूर्तिकारांनी साकारल्या देवीच्या अत्यंत कलात्मक सुबक मूर्ती : शक्तीचा स्रोत असलेल्या दुर्गेचा नवरात्रोत्सव
प्रतिनिधी /बेळगाव
‘सज्जनांचे रक्षण आणि दुष्टांचे निर्दालन कर’ अशी आराधना करत शक्तीचा स्रोत असलेल्या दुर्गेचा नवरात्रोत्सव गुरुवारपासून सुरू होत आहे. बेळगावमध्ये हा उत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात येतो. गणेशोत्सवानंतर मूर्तिकार लगेचच देवीच्या मूर्ती तयार करण्यात गर्क होतात.
पूर्वी बेळगावमध्ये ओडिशाहून मूर्तिकार मूर्ती तयार करण्यासाठी मुद्दाम येत असत. विविध मंडळे आणि संस्थांसाठी ते सुबक मूर्ती तयार करून देत असत. यंदा कोरोनामुळे त्यांचे येणे रहित झाले. तथापि, बेळगावमधील मूर्तिकारांनी देवीच्या अत्यंत कलात्मक अशा सुबक मूर्ती तयार केल्या असून, त्यांच्यावर शेवटचा हात फिरविण्यात येत आहे.
देवी ही अष्टभूजा मानली जाते. त्यामुळे बहुसंख्य मूर्तिकारांनी अष्टभूजा तयार केली आहे. ती सिंहावर आरुढ असून, तिच्या हातात शस्त्र आहे. महिषासुराचा वध देवीने केला. याचा अर्थ देवीने असुरी वृत्तीचा नाश केला, असा आहे. नवरात्राच्या निमित्ताने सर्व असुरी वृत्तींचे, दुष्टांचे निर्दालन करणे आवश्यक आहे. शहरातील मूर्तिकारांनी ज्या मूर्ती तयार केल्या आहेत; त्या मोठय़ा सुबक आहेत. घटस्थापनेच्या निमित्ताने शहरातील मंडळे मूर्तींची प्रतिष्ठापना करणार असून 9 दिवस अखंड जागर होणार आहे.
यावषी दुर्गादेवीच्या मूर्तींची ऑर्डर अधिक
गणेशोत्सव पूर्ण होताच आम्ही दुर्गादेवीच्या मूर्ती तयार करण्यास सुरुवात करतो. गणेशोत्सवाइतकीच आता तरुणांमध्ये दुर्गामूर्तीची पेझ आहे. कोरोनाचे संक्रमण काहीसे कमी झाल्याने मागील वषीपेक्षा यावषी दुर्गादेवीच्या मूर्तींची ऑर्डर अधिक असल्याचे शुभम याने सांगितले.
-शुभम बाळेकुंद्री (मूर्तिकार, पाटील गल्ली, वडगाव)
विजेचा वारंवार लपंडावामुळे कामात व्यत्यय
सध्या गल्लोगल्ली दुर्गादेवीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली जात आहे. यावषी नवरात्रोत्सव मंडळाच्या बऱयाच मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. 3 फुटांपासून ते 5 फुटांपर्यंत मूर्ती तयार केल्या जात आहेत. परंतु वारंवार विजेचा लपंडाव सुरू असल्याने कामात व्यत्यय येत असल्याची नाराजी रवी चित्रगार यांनी व्यक्त केली.
–रवी चित्रगार (मूर्तिकार, रयत गल्ली, वडगाव)