उचगाव / वार्ताहर
लग्नाचे आमिष दाखवून १० वर्षाहून अधिक काळ उचगाव व पन्हाळा येथे महिलेशी वेळोवेळी मनाविरुद्ध शारीरीक संबंध ठेवून लग्नास नकार देऊन फसवणूक केल्याबद्दल शिवराज बापूसाहेब भोसले सध्या रा. टाकळकर इस्टेट, हरिओमनगर, रंकाळ्यानजीक, कोल्हापूर या तरुणावर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
शिवराज भोसले याने उचगाव ता. करवीर येथील पीडित महिलेस लग्नाचे आमिष दाखवून २४ नोव्हेंबर २०१० ते डिसेंबर २०२० अखेर वेळोवेळी पन्हाळा येथे लॉजवर व फिर्यादीचे घरी तिच्या मनाविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर लग्नास नकार देऊन दुसऱ्या तरुणीशी लग्न करून फसवणूक केली. याशिवाय फिर्यादी पीडित महिलेच्या बहिणीच्या कार्यालयातील टायपिंग, व्हिजिटिंग कार्ड, डीटीपी व स्कॅनिंगची कामे करून बिले न देता भोसलेने फसवणूक केली. याबाबत उचगाव येथील पीडित महिलेने गांधीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिवराज भोसले याच्यावर गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले तपास करीत आहेत.