प्रतिनिधी/ रत्नागिरी
लग्नाचे आमिष दाखवून तरूणीशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करणाऱया तरूणावर ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आह़े हरिश अनंतराव वेदपाठक (27, ऱा मुळ उस्मानाबाद सध्या खेडशी- रत्नागिरी) असे आरोपीचे नाव आह़े दरम्यान फसवणूक झालेल्या तरूणीने ग्रामीण पोलिसांत तक्रार दाखल केली होत़ी त्यानुसार पोलिसांकडून कारवाई करण्यात आल़ी
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरूणी व आरेपी हे मुळचे उस्मानाबाद येथील रहिवासी आहेत़ त्यांचे घरच्यांकडून लग्न ठरवण्यात आले होत़े दरम्यान हे दोघेही नोकरीसाठी रत्नागिरीत वास्तव्याला होत़े खेडशी येथे 23 मार्च 2020 ते 10 मे 2020 या दरम्यान हरिश याने लग्नाचे आमिष दाखवून पीडित तरूणीवर वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केल़े काही महिन्यांनंतर पीडित मुलीच्या नातेवाईकांकडून हरिश याला लग्नासाठी विचारणा करण्यात आल़ी यावेळी हरिश याने पीडित तरूणीशी लग्न करण्यास नकार दिल़ा हरिश याने आपली व कुटुंबाची फसवणूक केल्याचे लक्षात येताच पीडितेने रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत तक्रार दाखल केल़ी या प्रकरणी पुढील तपास रत्नागिरी ग्रामीण पोलिसांकडून करण्यात येत आह़े