प्रतिनिधी / बेळगाव
लघुउद्योग भारती व पॅन इंडियातर्फे दि. 25 एप्रिल रोजी स्थापना दिवस साजरा करण्यात आला. 25 एप्रिल 1924 मध्ये ही संस्था उदयास आली. संस्थेच्या केंद्रीय आणि राज्यस्तरावर शाखा आहेत. बेळगाव शाखेनेसुद्धा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने स्थापना दिन साजरा केला. इंग्रजी विषयाच्या शिक्षिका असूनही कोरोनाकाळात वीणा वाघेला यांनी भाजी विक्री सुरू केली आहे. त्यांनी आत्मनिर्भर व मुद्रा कर्ज याबद्दल माहिती दिली. सुप्रिया, लता, कस्तुरी, गीता व अन्य महिला उपस्थित होत्या. लघुउद्योग भारतीच्या सचिव प्रिया पुराणिक यांनी स्वागत करून आभार मानले.