बालासोर
स्ट्रटेजिक फोर्स कमांड (एसएफसी) आणि भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) विकसित केलेल्या लघु पल्ल्याच्या ‘पृथ्वी’ या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी गुरुवारी करण्यात आली. पृथ्वी हे पृ÷भागावरून पृ÷भागावर मारा करणारे कमी पल्ल्याचे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आहे. 350 किलोमीटरपर्यंत मारा करणारे हे क्षेपणास्त्र आयटीआरच्या क्षेत्र-3 मध्ये मोबाईल लाँचरद्वारे सोडण्यात आल्याचे डीआरडीओच्या अधिकाऱयांनी सांगितले.
ओडिशाच्या बालासोर किनाऱयावरून या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. या क्षेपणास्त्राने एसएफसीने ठरवलेल्या आपल्या मोहिमेचा प्रत्येक उद्देश पूर्ण केला. पृ÷भागावरून पृ÷भागावर मारा करणारे हे क्षेपणास्त्र अण्वस्त्र वाहून नेण्यासही सक्षम आहे. हे अत्याधुनिक क्षेपणास्त्र चांदिपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्र (आयटीआर) येथून सोडण्यात आले. तसेच ही चाचणी यशस्वी ठरल्याचेही सांगण्यात आले. ‘पृथ्वी’ प्रवर्गातील 1, 2, 3 अशी तीन क्षेपणास्त्रे असून त्यांची मारक क्षमता अनुक्रमे 150 किलोमीटर, 350 किलोमीटर आणि 600 किलोमीटर इतकी आहे.