हॅप्पी बर्थडे मम्मीजी लघूपट
बॉलिवूड अभिनेत्री शेफाली शहा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. शेफालीने आता दिग्दर्शनातही पाऊल टाकले आहे. शेफालीने ‘हॅप्पी बर्थडे मम्मीजी’ या लघूपटाचे दिग्दर्शन केले आहे. या लघूपटाचे चाहत्यांसह समीक्षकांनीही कौतुक केले आहे. तिच्या या लघूपटाने युटय़ूबवर 10 दिवसांमध्ये 10 लाख ह्यूजचा आकडा ओलांडला आहे. दिग्दर्शनात पदार्पण करणाऱया व्यक्तीसाठी ही कामगिरी निश्चितच मोठी आहे.
लघूपट त्याच्या मार्मिक कथानकासाठी देखील कौतुकाचा विषय ठरत असून त्याचे लेखन शेफाली हिनेच केले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सुरू असलेल्या या कौतुकाने भारावून गेलेल्या शेफालीने आभार व्यक्त केले आहेत. ‘हॅप्पी बर्थडे मम्मीजी’ या लघूपटाला मिळालेला प्रतिसाद आणि निरपेक्ष प्रेमामुळे भारावून गेले आहे. मी आणखी काही मागू शकत नसल्याचे तिने म्हटले आहे.
याचबरोबर विपुल अमृतलाल शहा यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला चित्रपट ‘ह्युमन’मधील भूमिकेमुळे शेफाली चर्चेत आहे. मेडिकल थ्रिलरमधील तिचा फर्स्ट लुक नुकताच समोर आला आहे. तसेच चाहते डार्लिंग आणि डॉक्टर जी यासारख्या मेगा चित्रपटांमध्ये तिचा कसदार अभिनय पाहण्यासाठी उत्सुक आहेत. ‘दिल्ली क्राइम’ या जीवनातील वास्तविक अपराध आणि घटनांवर आधारित बेतलेली वेबसीरिज होती. या वेबसीरिजमध्ये शेफालीने मुख्य भूमिका साकारत स्वतःच्या दमदार अभिनयाने सर्वांची मने जिंकली होती.