डिजिटल उपक्रमांवर भर देण्याचे संकेत – प्रोत्साहन पॅकेज होणार उपलब्ध
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
ई-कॉमर्स क्षेत्रातील प्रमुख कंपनी ऍमेझॉन भारतामधील लघु आणि मध्यम उद्योजकांसाठी जवळपास 25 कोटी डॉलर (1,873 कोटी रुपये) इतका निधी उभारणार असल्याची घोषणा कंपनीने केली आहे. सदरच्या निधीचा वापर हा लघु आणि मध्यम उद्योगांना डिजिटल उपक्रमांसाठी ही मदत होणार असल्याची माहिती आहे. यासोबतच कृषी तंत्रज्ञान आणि आरोग्य तंत्रज्ञानातील क्षेत्राना प्रोत्साहन देणार असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.
ऍमेझॉन वेब सर्व्हिसेज विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अँड्रय़ू जेसी यांनी म्हटले आहे, की ‘लघू आणि मध्यम उद्योग अर्थव्यवस्थेचे इंजिन असतात त्यामुळे भारताबाबत ही गोष्टी खरी आहे, की आम्ही देशात लघु आणि मध्यम उद्योगांना चालना देण्यावर भर देणार असून त्यासाठी प्रोत्साहन पॅकेजची घोषणा करीत असल्याचेही सीईओंनी नमूद केले आहे.
ऍमेझॉन इंडियाचे जागतिक पातळीवरील वरिष्ठ उपाध्यक्ष आणि भारतामधील प्रमुख अमित अग्रवाल यांनी म्हटले आहे, की सदरचा निधी हा सर्व पातळीवर विचार करुनच उभारण्याचे ध्येय निश्चित केले आहे. दूरदृष्टी सक्षम करणाऱया उद्योगांना मजबूत स्थान प्राप्त होणार असल्याचेही अग्रवाल यांनी स्पष्ट केले आहे.