तुम्ही बेसनचा, मुगाचा, रव्याचा ढोकळा बनवला असेल. आता झटपट होणारा ब्रेडचा ढोकळा बनवून बघा.
साहित्य : चार ब्रेड स्लाईस, अर्धा कप घट्ट दही, एक चमचा साखर, एक चमचा लिंबाचा रस, थोडी कोथिंबिर, किसलेलं ओलं खोबरं, तडक्यासाठी तेल, मोहरी, दोन ते तीन हिरव्या आणि लाल मिरच्या.
कृती : एका कढईत तेल गरम करून मोहरी घाला. मोहरी तडतडल्यावर त्यात लाल आणि हिरव्या मिरच्या थोडय़ा तळून घ्या. आता त्यात अर्धा कप पाणी, मीठ आणि साखर घाला. उकळल्यावर गॅस बंद करा आणि लिंबाचा रस घाला. हा तडका बाजूला ठेऊन द्या. आता चारही ब्रेड स्लाईस एकमेकांवर ठेवा. कडा कापून घ्या. दह्यामध्ये चवीनुसार मीठ घालून नीट मिसळून घ्या. एका ब्रेडला दही लावून घ्या. त्यावर दुसरा ब्रेड ठेवा. आता हे सँडविचचे चौकोनी तुकडे करा. यानंतर तडका या तुकडय़ांवर घाला. शेवटी कोथिंबिर आणि खोबरं घालून सजवा. सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत खायला द्या.