लेह : संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आज लडाखच्या दौऱयावर असणार आहेत. या दौऱयात संरक्षणमंत्री प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक (एलएसी) तयारींचा आढावा घेणार आहेत. हा दौरा दोन दिवसांचा असणार आहे. राजनाथ सिंग एलएसीनजीकच्या काही रस्त्यांचे उद्घाटनही करणार आहेत. पूर्व लडाखमध्ये एलएसीवर भारत आणि चीन यांच्यात तणाव आहे. पँगोंग सरोवराच्या उत्तर आणि दक्षिण काठावरून दोन्ही देशांचे सैनिक मागे हटले आहेत. पण अद्याप दोन्ही बाजूला 50-60 हजार सैनिक एलएसीवर तैनात आहेत. भारताने एलएसीनजीकच्या भागांमध्ये पायाभूत विकासाला वेग दिला आहे. चालू महिन्यातच संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी अरुणाचल प्रदेशचा दौरा करत 12 रस्ते देशाला समर्पित केले होते.
Next Article ताज हॉटेलमध्ये घुसणाऱया अतिरेक्यांना रोखा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.