ऑनलाईन टीम / जम्मू :
लडाखच्या लेहमध्ये गुरुवारी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता 3.5 रिश्टल स्केल एवढी होती.या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही आहे.
यापूर्वी मंगळवारी देखील सकाळी 11.30 वाजता भूकंप झाला होता. भूकंपाची तीव्रता 3.0 रिश्टल स्केल एवढी होती.त्यावेळी देखील कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.