ऑनलाईन टीम / जम्मू :
केंद्र शासित प्रदेश लाडखमध्ये आज म्हणजेच शनिवारी पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीनुसार, या भूकंपाची तीव्रता 3.6 रिश्टल स्केल एवढी होती. काल म्हणजेच शुक्रवारी देखील येथे भूकंपाचे धक्के जाणवले होते.
मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी 8.27 वाजता लडाखमध्ये भूकंप झाला. या भूकंपामुळे सध्या तरी कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही आहे.
तर शुक्रवारी सकाळी 11 वाजून 2 मिनिटांनी झालेल्या भूकंपाची तीव्रता 4.2 रिश्टल स्केल एवढी होती. यापूर्वी गुरुवारी देखील डाडा येथे भूकंप झाला होता, त्याची तीव्रता 3.2 रिश्टल स्केल इतकी होती.