श्रीनगर
ः लडाखच्या नुब्रा उपविभागात एक बांधकाम सुरू असलेला पूल रविवारी कोसळला. त्याच्या ढिगाऱयाखाली दबून चार मजुरांचा मृत्यू झाला. लेहमधील डिस्किट गावाजवळील निर्माणाधीन शात्से टकना पुलाचा एक भाग कोसळल्याचे अधिकाऱयांनी सांगितले. या दुर्घटनेत ढिगाऱयाखाली 6 मजूर गाडले होते. सायंकाळपर्यंत चौघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. तर जखमी अवस्थेत बाहेर काढलेल्या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्हय़ातील राज कुमार आणि वरिंदर, छत्तिसगडमधील मनजीत आणि पंजाबमधील लव कुमार अशी मृतांची नावे आहेत. राजौरी येथील कोकी कुमार आणि छत्तीसगड येथील राजकुमार अशी जखमींची नावे आहेत.