श्रीनगर / वृत्तसंस्था
जपानमध्ये झालेल्या भूकंपाच्या दुसऱयाच दिवशी लडाख आणि जम्मू काश्मीरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. दुपारी 12.20 वाजता 4.2 तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. भूकंपाचा केंद्रबिंदू कारगिलच्या उत्तर-वायव्येस 160 किमी अंतरावर होता. तर त्याची खोली जमिनीच्या खाली 85 किमी होती. तत्पूर्वी जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये बुधवारी रात्री 9.40 वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रताही 4.2 रिश्टर स्केल इतकी मोजली गेली. भूकंपाचा केंद्रबिंदू श्रीनगरपासून 119 किमी उत्तरेस असल्याचे सांगण्यात आले. या दोन्ही धक्क्यांमध्ये जीवित किंवा मालमत्तेची हानी झाल्याचे वृत्त नाही.