ऑनलाईन टीम / मुंबई :
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती खालावली असून, त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. ब्रीच कँडी रुग्णालयाचे डॉक्टर प्रतीत समदानी यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
लता मंगेशकर यांना 8 जानेवारीला कोरोनाची लागण झाली होती. त्यासोबतच त्यांना न्यूमोनियाही झाला होता. तेव्हापासून त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. मागील आठवडय़ात त्यांची प्रकृती स्थिर होती. मात्र, आज पुन्हा त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असून, डॉक्टरांचं एक पथक त्याच्यावर 24 तास लक्ष ठेवून आहे.
लता मंगेशकर यांच्यावर गेल्या 27 दिवसांपासून ब्रीच कँडी रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीसाठी, उत्तम स्वास्थ्यासाठी अनेकजण प्रार्थना करत आहेत.