वारणानगर/प्रतिनिधी
भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे ऐत्याहासिक गड पन्हाळा, लोक दैवत श्री. जोतिबा ही विशेष श्रध्दांस्थान होते डिसेबंर सन ४ डिसेबर १९९३ ला त्यानी कोडोली ता. पन्हाळा येथे तत्कालीन फौजदार आर.आर. पाटील यांच्या घरी भेट दिली होती.
छत्रपती शिवरायांवर निस्सीम श्रंध्दा असलेने लता दिदी यानी आपले निवासस्थान पन्हाळा येथे बांधले बहुतांशी उन्हाळ्याच्या सुट्टीत त्या पन्हाळ्यावर वास्तव्यास येत असत पन्हाळ्यावर पावन गडाच्या मार्गावर असलेल्या बंगल्यात त्या कधी आल्या व कधी गेल्या कुणाला फारसे कळत नसत पन्हाळ गडावर त्या फिरायच्या त्यावेळी काही स्थानिक नागरिकांशी त्या गप्पा मारायच्या छत्रपती शिवरायावर चित्रपट निर्मीती करून स्वराज्याचा इतिहास तेवत ठेवणाऱ्या चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांच्याबद्दल नितांत श्रध्दा असणाऱ्या लतादिदीनी भालजीचे अंतीम संस्कार व त्यांचे स्मारक पन्हाळा येथे करण्यास आग्रही भूमिका घेवून ते पूर्णत्वास नेले आजही तीन दरवाज्या समोर भालजी पेंढारकर लता दिदीच्या कार्याची साक्ष देत आहे पन्हाळा नगरीचे तत्कालीन नगराध्यक्ष स्वर्गीय बाळासाहेब भोसले यानी लता दिदीच्या विनंतीला मान देत तात्काळ भालजीच्या स्मारकास जागा दिली.
लता दिदी तशा धार्मिक देवधर्मावर त्याची नितांत श्रध्दां पन्हाळ गडावर मुक्काम असल्यावर त्या कायमच दख्खनचा राजा लोकदैवत श्री जोतिबाच्या दर्शनाला सकाळी सकाळीच पोहचायच्या त्यावेळी विशेष गर्दी नसायची त्यामुळे “श्री” च्या दर्शनाला त्या येवून गेलेल्या कोणाला अधिक माहिती पडायचे नाही प्रसिध्दी पासून त्या अलिप्त रहायच्या सोबत कायमच पोलीस बंदोबस्त असल्याने त्यांना फारसे जनमानसात जायचे अडचणीचे ठरायचे.
लतादिदी पन्हाळा येथे मुक्कामी असलेवर सन १९९३ मध्ये क्षेत्र जोतिबाच्या दर्शनाला आलेवर सदर ठिकाणी कोडोलीचे तत्कालीन फौजदार आर.आर. पाटील बंदोबस्तास होते आर.आर. यांची देवभक्ती पाहून त्यानी त्याच्या कोडोली येथील रहात असलेल्या घरी भेट देण्याचे स्वत्ताच मान्य करीत लगेच दुसऱ्या दिवशी त्या कोडोलीत आल्या लता दिदी येणार म्हणून अगदी फुलाचा गालीचा प्रवेश द्वारात केला होता त्या फुलाच्या गालीच्या वरून चालण्यास नम्र नकार देत लता दिदी जमिनीवरूनच चालत घरात आल्या त्याची ही नम्रता पाहून सर्वानाच गर्व वाटला सदर वेळी फौजदार आर.आर. पाटील यांच्या घरी त्याच्या आई, पत्नी सौ. कुंजलता मुले व नातेवाईक यांच्याशी संवाद साधला राज्याचे लोकप्रिय नेते आर.आर. पाटील यांचे बंधू फौजदार आर.आर. पाटील आहेत हे समजल्यावर या दोन बंधूच्या कर्तृत्वाचा त्यांना हेवा वाटला अखेर पर्यन्त आर.आर. पाटील यांना अधून मधून तसेच त्यांच्या वाढदिवसास फोनवर शुभेच्छा देत होत्या.आर.आर.पाटील यांच्या मुळेच कोडोलीला स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे येणे झाले.