कोल्हापूर प्रतिनिधी
लालही मारो मारो मरे सेवालाल… या सुप्रसिध्द सेवालाल महाराज जयंती गीत गायले. तर हालगीच्या तालावर महिलांनी पारंपारिक लोकनृत्य करीत परिसराचे लक्ष वेधले. या लोकगीतातून सेवालाल महाराज यांच्या कार्याचा आढावा घेतला. सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. समाजातील विविध मागण्यांचा ठराव एकमताने मंजूर करून जिल्हाधिकाऱयांना देण्यात आला. लमान समाज विकास संघाच्या वतीने शाहू स्मारक भवनमध्ये संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात लमान समाजाचे विविध ठराव एकमताने मंजूर केले. अध्यक्षस्थानी मल्हार सेनेचे सरसेनापती बबनराव रानगे होते. दसरा चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळय़ाला अभिवादन करून कार्यक्रमाला सुरूवात केली.
मल्हार सेनेचे सरसेनापती बबराव रानगे म्हणाले, सेवालाल महाराज यांनी दिलेली सामाजिक सेवेची शिकवण पुढे घेवून जाने समाजातील तरूणाईचे कर्तव्य आहे. गेल्या कित्येक वर्षापासून कामाच्या निमित्ताने वारंवार या समाजाला स्थलांतर करावे लागते. त्यामुळे कामाच्या ठिकाणी त्यांचे टेंट हमखास असतात. हेच टेंट आता गर्भश्रीमंत असलेल्या व्यक्तींची फॅशन बनली असून विकएंडला श्रीमंत वर्ग टेंटमध्ये राहून मौजमजा करतात. परंतू या समाजातील लोकांनाही आपल्या हक्काच्या घरात राहण्याची इच्छा होतच असणार, याचा विचार शासन कधी करणार, असा प्रश्न रानगे यांनी उपस्थित केला. प्रास्ताविक लमान महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामचंद्र पवार यांनी केले. अवधुत पाटील यांनी सुत्रसंचालन केले. संतोष राठोड यांनी आभार मानले. यावेळी सुनिल राठोड, पुंडलिक चव्हाण, प्रकाश चव्हाण, रोहिदास राठोड, रामदास राठोड, किसन राठोड, विमल राठोड, संगिता राठोड, सुनिता राठोड, रूक्मीणी चव्हाण, पारूबाई राठोड आदी उपस्थित होते.
लमान समाजाचे ठराव एकमताने मंजूर
महामंडळाचे कर्ज योजनेस बँकांना कजं देण्याबाबत सक्ती करावी. लमान बंजारा मांजातील लोकांची तेथील प्रतिनिधींना त्यांचे मतदार संघात नावे समाविष्ठ करण्याचा आदेश द्यावा. संपूर्ण राज्यभरातील लमान समाजातील लोकांना दारिद्रय रेषेखालील कार्ड कायम स्वरूपी देण्यात यावे. यासह दहा मागण्यांचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.