वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना महामारी आणि जागतिक स्तरावर सेमिकंडक्टर चीपची टंचाई असतानाही इटलीतील लक्झरी कारनिर्माती कंपनी लम्बोर्गिनीने भारतासहीत जगभरात 8 हजार 405 वाहनांची विक्री केली आहे. कंपनीने विक्रीमध्ये 59 वर्षांच्या इतिहासात ही सर्वोच्च कामगिरी पार पाडली आहे.
मागच्या वषी सर्वाधिक कारची मागणी लम्बोर्गिनीने पुरवली आहे. 2021 मधील वरील विक्री ही 2020 च्या तुलनेत 13 टक्के अधिक आहे. युरुस सुव्ह ही जागतिक स्तरावर सर्वाधिक विक्रीची कार ठरली आहे. 2021 मध्ये 5021 युरुसची विक्री करण्यात आली. त्यापाठोपाठ हुराकानच्या 2586 कार्स विक्री झाल्या तर अवेंडेटर-व्ही वनचा तिसरा नंबर विक्रीत लागतो.
भारतात युरुस सुव्हच्या 100 गाडय़ांची विक्री झाली आहे. यात चार मॉडेल्स सादर करण्यात आल्या आहेत. भारतात विक्री पर्व सुरू केल्यापासून आजतागायत कंपनीने 300 कार्स विकल्या आहेत.
52 देशात विक्री
एकंदरच विक्रीतील कामगिरी कंपनीचा उत्साह अधिक वाढवणारी असल्याचे लम्बोर्गिनीचे अध्यक्ष व सीईओ स्टीफन विकेलमन यांनी म्हटले आहे. लम्बोर्गिनीच्या कार्स या 52 देशांमध्ये विकल्या जातात.
यावषी 4 नव्या गाडय़ा
मागच्या वषी कंपनीने 3 गाडय़ा लाँच केल्या होत्या. त्यात हुराकान एसटीओ, अवेंडेंटर व काऊंटचा समावेश होता. यंदा कंपनी 4 नव्या गाडय़ा बाजारात उतरवणार असल्याचे सांगितले जाते.