डिस्कव्हरी वाहिनीवर प्रसारित होणार कार्यक्रम
अत्यंत लवकरच मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर एकत्र काम करणार आहेत. प्रसूतीनंतर करिना कपूरने डिस्कव्हरी वाहिनीवरील सिलेब्रिटी कुकिंग शो ‘स्टार व्हर्सेस फूड’साठी चित्रिकरण केले होते. आता या शो साठी मलायका आणि अर्जुन कपूर चित्रिकरण करणार आहेत.
मलायकाने या शोसाठी स्वतःचे चित्रिकरण संपविले आहे. तर अर्जुन स्वतःच्या हिस्स्याचे चित्रिकरण जुहूच्या एका रेस्टॉरंटमध्ये करणार आहे. बॉलिवूडमध्ये मलायका आणि अर्जुन यांची जोडी सर्वाधिक चर्चेत आहे. दोघेही अनेकदा परस्परांसोबत आउटिंगवर आणि पाटर्य़ांमध्ये दिसून येतात. मलायका आणि अर्जुनने कधीच स्वतःचे नाते लपविण्याचा प्रयत्न केलेला नाही.