कंपनीकडून 15 सेकंदाचा टीझर सादर – 15 डिसेंबर रोजी होणार सादर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आप्पोने अंतिमतः आपला फोल्डेबल स्मार्टफोन फाइंड एन (इग्ह्ऱ) ची पहिली झलक सादर केली आहे. कंपनीने सोशल मीडियावर 15 सेकंदाचा एक टीझर सादर केला आहे. या टीझरमध्ये स्मार्टफोन दिसत आहे.
हा फोल्डेबल स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्डसोबत मिळताजुळता दिसत आहे. या स्मार्टफोनचे सादरीकरण येत्या 15 डिसेंबर रोजी होणार असल्याचीही माहिती कंपनीने दिली आहे. चालू वर्षात आणखीन फोल्डेबल स्मार्टफोन भेटीला येणार असल्याची माहिती आहे.
टीझरमध्ये या फोल्डेबल फोनला चारही बाजूना मेटल फिनिशिंग आणि दोन ओल्ड डिस्प्ले स्क्रीन असल्याचे दिसून येत आहे. सदरचा फोल्डेबल स्मार्टफोन हा ग्राहकांना एक वेगळा अनुभव देणारा ठरणार असल्याची माहिती आहे.
काय आहे 15 सेकंदामध्ये
सदरच्या 15 सेकंदाच्या टिझरमध्ये कंपनीने ग्रॅव्हिटी इफेक्ट दिला आहे. एक रुमच्या आत चेअर, लॅम्प, स्टूल आणि अनेक वस्तूंसोबत एक व्यक्ती हवेत उडत असल्याचे दिसून येत आहे. यासोबतच ओप्पो फाइंड एन हा हॅण्डसेटही हवेत असल्याचे पहावयास मिळत आहे.