अनावश्यक वस्तूंवर कर आकारणी वाढण्याची शक्मयता
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
वस्तू आणि सेवा कर(जीएसटी) परिषदेची 40 वी बैठक येत्या 14 जून रोजी होणार आहे. कोरोना महामारीच्या संकटात ही पहिलीच जीएसटी परिषद होणार आहे. कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊनची घोषणा 25 मार्चपासून संपूर्ण देशात लागू करण्यात आली आहे. यामुळे कर वसूली मोठय़ा प्रमाणात प्रभावीत झालेली आहे. जीएसटी बैठकीत कर वसूलीला पुन्हा तेजी आणण्याबाबत चर्चा केली जाणार असल्याचे जाणकारांकडून सांगण्यात येत आहे.
अनावश्यक वस्तूंवर कराचे शुल्क वाढविण्याचा विचार होण्याची शक्मयता असल्याची माहितीही तज्ञांनी दिली आहे. सदरची बैठक केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. यामध्ये राज्य आणि केंद्र शासित प्रदेशाचे सदस्य सहभागी होणार असून ही परिषद व्हीडीओच्या आधारे घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
या अगोदर मार्चमध्ये जीएसटी परिषदेची 39 वी बैठक घेण्यात आली होती. कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर पडलेल्या वेगवेगळय़ा परिणामाची चर्चा केली होती आणि आताही त्याच मुद्यावर पुन्हा चर्चा होण्याचे संकेत व्यक्त करण्यात आले आहेत.