मेरीटाइम थिएटर कमांडची होणार घोषणा : तिन्ही संरक्षण दलांची बैठक
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात भारतातील पहिली मेरीटाइम थिएटर कमांडची घोषणा होऊ शकते. यासंबंधी मागील आठवडय़ात तिन्ही संरक्षण दलांची एक बैठक झाली आहे. वेस्टर्न नेव्ही कमांडर व्हाईस ऍडमिरल अजयेंद्र बहादुर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सैन्य आणि वायुदलाच्या प्रतिनिधींनी संयुक्त कमांडवर चर्चा केली. एमटीसीत पूर्व आणि पश्चिम नौदल कमांडसह सैन्य आणि वायुदल देखील सामील असेल. देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ राहिलेले जनरल बिपिन रावत यांनी चार संयुक्त थिएटर कमांड निर्माण करण्याचा प्रस्ताव मांडला होता.
2019 मध्ये सीडीएस पद स्वीकारल्यापासून रावत सशस्त्र दलांच्या एकीकरणावर कार्यरत होते. त्यांच्या अकाली मृत्यूनंतर अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करण्याच्या दिशेने वेगाने पावले उचलली जात आहेत.
मेरीटाइम थिएटर कमांडचे स्वरुप कसे असावे यासंबंधी नौदल स्वतःच्या शिफारसी संरक्षण मंत्रालयाला देणार आहे. तिन्ही दलांची संयुक्त बैठक याच कारणामुळे बोलाविण्यात आली होती. अध्ययन अहवाल एप्रिलपर्यंत सादर होण्याची अपेक्षा आहे. 15 ऑगस्ट रोजी मेरीटाइम थिएटर कमांडची घोषणा सरकार करू शकते.
मेरीटाइम थिएटर कमांडर…
भारतातील सर्वात मोठय़ा सैन्य पुनर्रचना योजनेच्या अंतर्गत ही पहिली नवी ‘भौगोलिक’ थिएटर कमांड असणार.
मेरीटाइम थिएटर कमांडमध्ये तिन्ही दलांचे इंटीग्रेशन होईल. या अंतर्गत नौदलाची पूर्ण फ्लीट येणार आहे.
एमटीसीवर देशाच्या 7,516 किलोमीटर लांब किनाऱयाच्या देखरेखीची जबाबदारी असणार आहे.
संपूर्ण हिंदी महासागर क्षेत्र (आयओआर) आणि त्यापुढेही मेरीटाइम थिएटर कमांडर नजर ठेवणार आहे.
कमांडचे नेतृत्व थ्री-स्टार नौदल अधिकाऱयाच्या हातात असेल. मुख्यालय कर्नाटकातील कारवारमध्ये असेल.
थिएटर कमांडरचे रिपोर्टिंग सीडीएसच्या नेतृत्वाखालील जॉईंट चीफ ऑफ स्टाफ कमिटीला होईल.
एमटीसी अंतर्गत काय येणार?
ईस्टर्न नेव्हल कमांड (मुंबई)
वेस्टर्न नेव्हल कमांड (विशाखापट्टणम)
ट्राय-सर्व्हिस अंदमान आणि निकोबार कमांड (पोर्ट ब्लेयर)
सदर्न एअर कमांड (तिरुअनंतपुरम)
सैन्याच्या दोन असॉल्ट फॉर्मेशन (तिरुअनंतपुरमची 91 वी ब्रिगेड आणि पोर्ट ब्लेयरची 108 वी ब्रिगेड)
तटरक्षक दलाच्या पूर्व आणि पश्चिम रिजन्स (पेट्रोलबोट्स, एअरक्राफ्ट्स, हेलिकॉप्टर्स यासारख्या सर्व साधनांसह )
एमटीसीत तिन्ही दलांच्या वर्टिकल्स असतील.
कोण होणार पहिला कमांडर?
4 नव्या थिएटर कमांड निर्माण करण्याची सैन्य विषयक विभागाची योजना आहे. यात लडाख सेक्टर सामील पेले जाणार नाही. हेलिकॉप्टर दुर्घटनेत जनरल रावत यांच्या मृत्यूनंतर थिएटर कमांड प्रकरणी मुंबईत व्हाईस ऍडमिरल ए. बी. सिंह यांच्या नेतृत्वाखाली पहिली मोठी बैठक झाली. सिंह हे नौदलात कमांडर-इन-चीफ रँकचे सर्वात वरिष्ठ अधिकारी आहेत. ते मेरीटाइम थिएटर कमांडचे पहिले कमांडर ठरू शकतात.