नवीदिल्ली : देशामध्ये इलेक्ट्रिक मोबिलिटीला चालना देण्यासाठी सरकार 69 हजार पेक्षा अधिक पेट्रोल पंपावर ईव्ही चार्जिग केंद लावण्यावर विचार करत आहे. या व्यतिरिक्त सरकार तेल कंपन्या आणि कंपनी ओन्ड, कंपनी ऑपरेटिव्ह (सीओसीओ) पेट्रोल पंपावर ईव्ही चार्जिंग केंदांना आवश्यक रुप देण्यावर विचारविनिमय होण्याचे संकेत आहेत. सध्या ईव्ही चार्जिंग पायाभूत सुविधासह अन्य गोष्टीसाठीची समीक्षा बैठक संपन्न झाली आहे. सदर बैठकीत वीज मंत्री आर. के. सिंह यांनी तेल मंत्रालयातील वरि÷ अधिकाऱयांना सूचना दिल्या आहेत की सीओसीओ पेट्रोल पंपावर चार्जिंग केंद उभारण्याचा आदेश सादर केला जाण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देशातील सर्व पेट्रोल पंपावर ईव्ही चार्जिंगची सुविधा उपलब्ध करुन देण्याचे ध्येय सरकारचे असून या निर्णयामुळे सदर प्रकल्पास मोठी मदत मिळणार असल्याचे स्पष्ट केले आहे. काही महिन्यापूर्वी तेल मंत्रालयाने पेट्रोल पंपांसाठी नवीन मार्गदर्शक सुचना सादर केल्या आहेत. देशातील जवळपास 69 हजार पेट्रोलपंप असे आहेत की त्या पंपावर ईव्ही चार्जिंग सुविधा मिळण्यासह मोबिलिटीला चालना देणारी बाब असल्याचेही म्हटले आहे. वीज मंत्रालयाने हायवेसोबत दिल्ली एनसीआर, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद, बेंगळूर, वडोदरा आणि भोपाळमध्ये ईव्ही चार्जिंग उभारण्यासाठी पायाभूत सुविधाची योजना आखली जात असल्याची माहिती आहे.
Previous Articleकोरोनामुळे आणखी चौघांचा मृत्यू
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.