ऑनलाईन टीम / बीड :
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यानंतर बहीण पंकजा मुंडे यांनी सर्व मतभेद बाजूला सारून भाऊ धनंजय मुंडे यांना फोन करून त्यांची विचारपूस केली असल्याची माहिती समोर येत आहे.
यावेळी पंकजा मुंडे यांनी फोनवर धनंजय मुंडे यांना, ‘प्रकृतीची काळजी घ्या आणि लवकर बरे होऊन घरी या’, अशा शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या. तसेच यावेळी त्यांनी परिवारातील अन्य सदस्यांची देखील चौकशी केली.
दरम्यान, धनंजय मुंडे यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना श्वसनाच्या त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यांना ब्रीज कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.