‘स्कॅम 1992’ या वेबसीरिजमधील लोकप्रिय अभिनेता प्रतीक गांधी लवकरच अभिनेत्री विद्या बालनसोबत एका चित्रपटात दिसून येणार आहे. हा एक रोमांटिक कॉमेडी ड्रामा चित्रपट असेल. चित्रपटात प्रतीक गांधी आणि विद्या बालन यांच्या व्यक्तिरेखांमधील रोमांस पहायला मिळणार आहे.
शीर्षा गुहा यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱया या चित्रपटाचे शीर्षक ‘लव्हर्स’ असणार आहे. तसेच याचे चित्रिकरण लवकरच सुरू होणार आहे. मुंबई आणि तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये याचे चित्रिकरण प्रामुख्याने होणार आहे. हा चित्रपट एलिप्सिस एंटरटेनमेंटकडून निर्माण करण्यात येणार आहे.
या चित्रपटाची कथा दोन जोडप्यांच्या भोवती घुटमळणारी आहे. निर्मात्यांनी विद्या आणि प्रतीक यांच्या स्वरुपात पहिली जोडी निश्चित केली आहे. तर दुसऱया जोडीसाठी कलाकारांचा सध्या शोध घेतला जात आहे. सामाजिक पित्तृसत्तेला आव्हान देणारी पटकथा या चित्रपटाच्या माध्यमातून मांडली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.