हिंदू प्रेमींचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी/ बेळगाव
उत्तरप्रदेश, गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये लव्ह जिहादविरोधी कायदा लागू झाला आहे. त्याचप्रकारे कर्नाटकातही हा कायदा अंमलात आणावा, अशी मागणी हिंदूप्रेमी युवकांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे. गृहमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नावाने हे निवेदन देण्यात आले.
बेळगाव परिसरात लव्ह जिहादच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे हिंदू मुली असुरक्षित झाल्या आहेत. हिंदू मुलींना जाळय़ात ओढून त्यांचा धर्म बदलण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ही बाब अत्यंत गंभीर आहे. याला आळा बसायचा असेल तर लव्ह जिहादविरोधी कायद्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये हा कायदा अंमलात आणण्यात आला आहे. त्याचप्रकारे कर्नाटकातही हा कायदा लागू करावा, अशी मागणी करण्यात आली.
जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सौरभ सावंत, संजय पाटील, संदीप चौगुले, भूषण पाटील, विवेक महांतशेट्टी, सचिन शिवण्णावर, प्रथमेश अष्टेकर यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.