ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
संरक्षण मंत्रालयाने भारतीय लष्कराच्या 4000 कोटींच्या उपग्रह प्रस्तावला मंजुरी दिली आहे. चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवरील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी या उपग्रहाची मदत होणार आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय लष्करासाठी समर्पित मेड इन इंडिया उपग्रहाच्या प्रस्तावाला मंगळवारी झालेल्या संरक्षण अधिग्रहण परिषदेच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. GSAT 7B असे या उपग्रहाचे नाव असून, या उपग्रहासाठीचा प्रकल्प भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या मदतीने पूर्ण केला जाणार आहे.
भारतीय वायुसेना आणि नौदलाकडे आधीच समर्पित उपग्रह आहेत. मात्र, या उपग्रहामुळे चीन आणि पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात पाळत ठेवण्याची क्षमता आणखी मजबूत होणार आहे.