प्रतिनिधी / बेळगाव
होन्नीहाळ (ता. बेळगाव) येथील लष्करी जवानाचा खून केल्याच्या आरोपावरुन मारिहाळ पोलिसांनी त्याची पत्नी व तिच्या प्रियकराला अटक केली आहे. या प्रकरणातील आणखी दोघे जण अद्याप फरारी असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
अंजली दीपक पट्टणदार (वय 26), तिचा प्रियकर प्रशांत दत्तात्रय पाटील (वय 28, दोघेही रा. होन्नीहाळ) अशी त्यांची नावे असून बेळगाव ग्रामीणचे एसीपी के. शिवारेड्डी, मारिहाळचे पोलीस निरीक्षक विजयकुमार, शिन्नूर व त्यांच्या सहकार्यांनी ही कारवाई केली आहे.