नवी दिल्ली / वृत्तसंस्था
लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. कोरोना व्यवस्थापनात सैन्याकडून सुरू असलेल्या मदतीच्या विविध उपक्रमांवर द्वयींमध्ये चर्चा झाल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली. सैन्य आपली रुग्णालये सर्वसामान्यांसाठी खुली करत आहे. जिथे शक्मय असेल तेथे सामान्य नागरिक लष्करी रुग्णालयात जाऊ शकतात. तसेच कोविडच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सैन्य देशाच्या विविध भागात तात्पुरती रुग्णालये बांधत असल्याचेही नरवणे यांनी पंतप्रधानांना सांगितले.
कोरोना संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलांची मदत घेण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार आढावा घेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंबंधी यापूर्वी हवाई दल प्रमुख आरकेएस भदौरिया आणि सीडीएस बिपिन रावत यांच्यासमवेत बैठक घेऊन चर्चा केली आहे. त्यानुसार सेना दलाला सज्ज राहण्याचे अप्रत्यक्ष संकेत केंद्राकडून मिळाल्याची माहिती उपलब्ध होत आहे.
लष्करी डॉक्टर्स-कर्मचाऱयांची मदत
लष्कराकडून नागरिकांसाठी शक्मय असेल त्याठिकाणी रुग्णालये सुरू केली जात आहेत. तसेच लष्कराचे वैद्यकीय कर्मचारी विविध राज्य सरकारांच्या मदतीसाठी तैनात करण्यात आल्याची माहिती जनरल एम. एम. नरवणे यांनी पंतप्रधानांना दिली. तसेच आयात केलेल्या ऑक्सिजन टँकर पुरवठय़ासाठीही सैन्यदल मनुष्यबळासह मदत करत आहे. अशी देखील माहिती यावेळी लष्करप्रमुख नरवणे यांनी पंतप्रधान मोदींना दिली. मागील काही दिवसांपासून सैन्य दलाच्या विमानांद्वारे परदेशातून ऑक्सिजन टँकर, ऑक्सिजन जनरेटरसह अन्य वैद्यकीय साहित्य भारतात आणले जात आहेत. याकामी लष्करी मनुष्यबळाचा वापर केला जात असल्याचा आढावा पंतप्रधानांनी घेतला.
भारताची सध्या कोरोनाच्या दुसऱया लाटेविरोधात लढाई सुरू आहे. दररोज लाखांच्या संख्येत कोरोनाबाधित रुग्ण वाढत असून रुग्णांच्या मृत्यूसंख्येतही मोठी वाढ सुरू आहे. आरोग्य यंत्रणेवरील ताण अधिक वाढला असून, औषधांसह आरोग्य सुविधांचा तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र आहे. यामुळे भारतासमोर निर्माण झालेल्या या संकटात जगभरातील अनेक देशांकडून मदतीचा हात देखील पुढे करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून विविध आढावा बैठका सुरू आहेत.