ऑनलाईन टीम / लडाख :
लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे दोन दिवसांच्या लडाख दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी त्यांनी पूर्व लडाखमधील फॉरवर्ड एरियाचा दौरा करून तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच यावेळी त्यांनी त्यांचे संवाद साधत त्यांनी दाखवलेल्या उच्च मनोवृत्तीचे कौतुक करत अशाच पद्धतीने काम करण्यास सांगितले.
गलवानमध्ये चिनी लष्कराने केलेल्या हिंसक चकमकीनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर तेथील भारतीय कमांडर्सशी चर्चा करण्यासाठी लष्करप्रमुख लडाख दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात सर्वात आधी त्यांनी जखमी जवानांवर उपचार सुरु असलेल्या लेह येथील लष्कर रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी जखमी जवानांची विचारपूस करत त्यांचं कौतुकही केलं.
दरम्यान, 15 जून रोजी गलवानमध्ये झालेल्या चकमकीत भारताचेे 20 जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारत आणि चीन मधील तणाव वाढला आहे.