प्रतिनिधी/सांगली
कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण मोहिम गतीने राबविली जात आहे. मात्र मंगळवारी जिह्यातील लसींचा साठा संपला आहे. बुधवार लसीचा पुरवठा झाला नसल्यामुळे गुरुवारीही रोजी लसीकरण बंद राहणार आहे. लोकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ अभिजीत चौधरी व मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.
केंद्र सरकारने 1 मे पासून 18 ते 45 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र लस उपलब्ध होण्याबाबत साशंकता आहे. त्यामुळे 18 ते 45 वयोगटातील लोकांसाठीचे कोरोना लसीकरण अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. त्यामुळे 13 लाख नागरिकांचे लसीकरण लांबणीवर गेले. मात्र 45 वर्षावरील लोकांचे लसीकरण लस उपलब्ध होईल, त्या प्रमाणात सुरु राहील. 18 वर्षे वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी व मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी माहिती दिली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गावडे उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी चौधरी म्हणाले, सध्या 45 वर्षावरील वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरु असून ज्यांना पहिला डोस दिला आहे. त्यांचा दुसरा डोस विहित वेळेत देण्यात येत आहे. यावयोगटातील नागरीकांचे लसीकरण पुर्वीप्रमाणे सुरु राहील. 18 वर्षावरील वयोगटातील नागरिकांसाठीच्या लसीकरणासाठी पुरेशा प्रमाणात लसींचा साठा उपलब्ध झाल्यावर तसेच याबाबतच्या शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यावर या वयोगटालाही तात्काळ लसीकरण करण्यात येईल तोपर्यंत या वयोगटातील नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये असे आवाहन त्यांनी केले.
जिह्यात आतापर्यंत 5 लाख 36 हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून 45 वर्षावरील वयोगटातील नागरिकांचे 75 टक्के लसीकरण झाले आहे. लस टंचाईमुळे 18 वर्षावरील नागरिकांना 1 मे पासून करण्यात येणारे लसीकरण पुढे जाण्याची शक्यता असून या वयोगटातील नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी या वयोगटासाठी ऑनसाईट रजिस्ट्रेशन ऐवजी प्री रजिस्ट्रेशची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून ग्रामपंचायत स्तरावर रजिस्ट्रेशन होणार आहे. गावाला जेवढÎा प्रमाणात लसीचा पुरवठा होणार आहे. त्याप्रमाणात लसीकरण केले जाणार आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रावर गर्दी करुन नये.
नोंदणी प्रक्रियेत शिक्षकांनी खुप मोठी भूमिका बजावल्याचेही सांगितले. झपाटÎाने वाढत असलेली रुग्णसंख्या कमी करण्यासाठी ग्राम दक्षता समित्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावणे आवश्यक असल्याचेही सांगितले. सध्या लसीकरण केंद्रावर 45 वर्षावरील नागरिकांना लसीकरण सुरु आहे. लसीकरण प्रक्रिया पुर्वीप्रमाणे सुरु राहणार असल्याचेही सांगितले.