ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ला आपत्कालीन वापरास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. नववर्षाच्या स्वागतालाच सरकारकडून सीरमच्या ‘कोविशिल्ड’ लसीलाही सशर्त परवानगी मिळाली आहे. त्यामुळे भारतातील लसीकरणाच्या युद्धात ‘कोविशिल्ड’ आणि ‘कोव्हॅक्सिन’ या दोन्ही लसींनी उडी घेतली आहे.
डीसीजीआयने म्हटले आहे की, ‘कोविशिल्ड’ आणि ‘कोव्हॅक्सिन’ या दोन्ही लसी सुरक्षित आहेत. दोन्ही लसींच्या आपत्कालीन वापरास परवानगी मिळणे हे लसीकरणाच्या मोहिमेतील महत्वाचे पाऊल आहे. ‘कोविशिल्ड’ लसीचे भारतात सध्या 5 कोटी डोस तयार आहेत. लसीकरण प्रत्यक्षात सुरू झाल्यास अडीच कोटी लोकांना ही लस दिली जाऊ शकते.
दरम्यान, शनिवारी देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोना लसीचे ड्राय रन घेण्यात आले. लसीकरण कार्यक्रम राबवताना येणारे अडथळे शोधण्यासाठी आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी घेण्यात आलेला हा ड्राय रन यशस्वी झाला.