प्रतिनिधी / बेंगळूर
खासगी इस्पितळांमध्ये देण्यात येणाऱया कोरोना प्रतिबंधक लसीसाठी 100 रुपये सेवाशुल्क आकारण्याची मुभा राज्य सरकारने दिली होती. मात्र, आता या शुल्कामध्ये वाढ करण्यात आली असून ते 200 रुपये इतके निश्चित करण्यात आले आहे.
लसीकरणासाठी येणाऱयांना आवश्यक सुविधा पुरविणे, लसीचा साठा व इतर कारणांसाठी अधिक खर्च होत असल्याने सेवा शुल्क 300 रु. पर्यंत वाढवावे, अशी मागणी खासगी इस्पितळ अणि नर्सिंग होम संघटनेने राज्य सरकारकडे केली होती. दरम्यान, आरोग्य खात्याचे उपसचिव बी. एस. नागराज यांनी लसीकरणासाठी 200 रुपये सेवाशुल्क आकारता येईल, असा आदेश जारी केला आहे.