डॉ. राजेंद्र बोरकर : पहिला कोरोना प्रतिबंधक डोस 100 टक्के तर दुसरा डोस 99 टक्के पूर्ण
प्रतिनिधी /पणजी
कोरोना प्रतिबंधक पहिल्या डोसचे 100 टक्के लसीकरण करणारे गोवा हे देशातील पहिल्या तीन राज्यांत समाविष्ट झाल्याचा दावा आरोग्य खात्याने केला आहे. हे लसीकरण 18 वर्षांवरील लोकसंख्येसाठी झाले असून 1 वर्ष 1 महिन्याने हे लक्ष्य साध्य करण्यात यश आल्याची माहिती राज्य लसीकरण अधिकारी डॉ. राजेंद्र बोरकर यांनी दिली आहे. कोरोनाच्या दुसऱया डोसचे लसीकरण 99.93 टक्के पूर्ण झाले असून ती लक्ष्य 100 टक्क्याच्या जवळपास पोहोचले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत पहिल्या दुसऱया डोसचे लसीकरणही 100 टक्के पूर्ण होईल, अशी खात्री त्यांनी व्यक्त केली आहे.
तपशीलानुसार, 15 वर्षे ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचे कोविड-19 लसीकरणदेखील लसीच्या पहिल्या डोसच्या 87 टक्के आणि दुसऱया डोसचे 64 टक्के लसीकरण पूर्ण केले आहे.
राज्यातील लसीकरणाच्या लक्षणीय व्याप्तीचा विचार करून, कोविड लसीकरणाचा कार्यक्रम आता बुधवार 16 फेब्रुवारीपासून राज्यातील नियमित लसीकरण कार्यक्रमासोबत राज्यातील सर्व शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये एकत्रित केला जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली. यामुळे वरील लस अद्याप मिळालेली नसलेल्या सर्वांना लस निरंतर, सुरळीत आणि खात्रीशीर उपलब्ध होणे शक्मय आहे. लसींचा अपव्यय कमी केला जाईल आणि आरोग्य सेवा कर्मचाऱयांचाही योग्य उपयोग केला जाईल, असे ते म्हणाले.