आतापर्यंत 58 लाखांहून अधिक जणांना पहिला डोस
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
जगामध्ये कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग झपाटय़ाने वाढला आहे. लसीकरणामध्ये जगात अव्वल असणाऱया देशांमध्ये भारत आता तिसऱया क्रमांकावर आहे. अमेरिका आणि ब्रिटन हे देश सध्या पहिल्या दोन स्थानांवर आहेत. भारतातही लसीकरण वेगात सुरू आहे. 50 लाख जणांना लसीकरण करण्यात भारताने आघाडी घेतलेली आहे. भारतात 12 राज्यांमध्ये प्रत्येकी 2 लाखांपेक्षा अधिक कोरोनायोद्धय़ांना लसीकरण करण्यात आले आहे.
देशभरात 7 फेब्रुवारी सकाळी 8 वाजेपर्यंत 57 लाख 75 हजार 322 लाभार्थ्यांना लस मिळाली आहे. यामध्ये 53 लाख 04 हजार 546 आरोग्य कर्मचारी आणि 4 लाख 70 हजार 776 प्रंटलाईन वर्कर्सचा समावेश आहे. गेल्या 24 तासात 3 लाख 58 हजार 473 लाभार्थ्यांना 8 हजार 875 केंद्रांमधून लस देण्यात आली. यापूर्वी लसीकरणाची 1 लाख 15 हजार 178 एवढी केंद्रे झाली आहेत. लसीकरण लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये रोज सातत्याने वाढ होत आहे.
रुग्णसंख्या-मृत्युंमध्ये घट
गेल्या 24 तासात भारतामध्ये दैनंदिन मृत्युंची संख्या 84 पर्यंत खाली आली आहे. ही 9 महिन्यातील सर्वात कमी संख्या आहे. देशातील सक्रिय रुग्णसंख्या 1.48 लाख इतकी आहे. तर आतापर्यंत 1.05 कोटी रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर हा 97.19 टक्के आहे. सोमवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासात 11 हजार 831 जण नवे बाधित सापडल्यामुळे आतापर्यंतच्या बाधितांचा आकडा 1 कोटी 8 लाख 38 हजार 194 वर पोहोचला आहे. तसेच 11 हजार 904 जणांना दिवसभरात डिस्चार्ज देण्यात आला आहे. अजूनही देशात 1 लाख 48 हजार 609 जण सक्रिय रुग्ण आहेत.