ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर रक्तात गाठी होण्याचे प्रमाण फार कमी रुग्णांमध्ये आढळून आले. ‘कोविशिल्ड’ लस घेतल्यानंतर देशात 26 रुग्णांच्या शरीरात रक्ताच्या गाठी झाल्याचे समोर आले तर ‘कोवॅक्सिन’ लस घेतल्यानंतर रक्तात गाठी झाल्याचा एकही रुग्ण आढळून आला नाही. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या राष्ट्रीय एईएफआय समितीच्या सोमवारी आलेल्या अहवालात ही माहिती उघड झाली.