तामिळनाडूच्या मदुराईतील लक्षवेधी ऑफर
देशात आता हळूहळू अनलॉक केले जात आहे. पण तिसऱया लाटेसंबंधी इशारा दिला जात आहे. या घातक विषाणूशी लढण्यासाठी लसीकरण मोहीम देखील चालविली जात आहे. देशवासीयांना वारंवार लस घेण्यासाठी प्रेरित केले जात आहे. सरकारकडून सर्वसामान्य नागरिक देखील लसीकरणाकरता जागरुकता निर्माण करत आहेत. तामिळनाडुतील एक सलूनमध्ये कोरोनावरील लस घेतलेल्या ग्राहकांना 50 टक्के सूट दिली जात आहे. या सलूनच्या ऑफरला चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे.
मदुराई येथील या सलूनचे मालक कार्तिकेयन यांनी लसीबद्दल जागरुकता वाढविण्यासाठी लसीकरण केलेल्या ग्राहकांना 50 टक्के सूट प्रदान करत असल्याची माहिती दिली आहे. कोरोनाच्या तिसऱया लाटेपासून वाचण्यासाठी सर्वांनी लस घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे.